नाशिक – फादर्स डे च्या दिवशी तलवारीने केक कापल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी शांताराम देवराम गुरगुडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून केक कापलेली तलवारही जप्त केली आहे. त्यामुळे तलवारीने केक कापणे गुरगुडे यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना तलवारीने केक कापल्याची माहिती व फोटो मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. गुरगुडे यांच्याकडून पोलिसांनी घरुन ही तलवार जप्त केली आहे.