नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामदैवत कालिका मंदिर परिसरात संशयित कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्याच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे साडे सहाशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंदा रविंद्र धामणकर, परेश कचरू देवडे व रवी रामदास निंबोरे (रा.सर्व कालीका मंदिरामागे सहवासनगर)अशी अटक केलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. कालिका मंदिर पाठीमागील सहावास नगर परिसरातील एका झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार बुधवारी (दि.२६) सायंकाळी मुंबईनाका पोलिसांनी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले असता ते कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून पोलिस शिपाई नवनाथ उघडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.