नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील नववा मैल भागात भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सौरभ रावसाहेब अहिरे (रा. उमरे पो उभरटी, ता. साक्री जि. धुळे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहिरे बुधवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास नाशिक कडून साक्रीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नववा मैल भागातील राजस्थानी ढाबा परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने भाऊ कमलेश अहिरे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. अधिक तपास आडगाव पोलिस करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651429113859813378?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651429151499489280?s=20