नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील अश्वमेधनगर भागात भिशीच्या आर्थिक व्यवहारातून दोघांनी महिलाच्या घरात घुसून तोडफोड करीत तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी काठीचा वापर करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू महाले (३८) व निलेश महाले (३६) अशी महिलेच्या घरात घुसून मारहाण करणाऱ्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अश्वमेधनगर भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिला भिशीचा व्यवसाय सांभाळते. आर्थिक कारणातून दोघा संशयितांनी रविवारी (दि.२३) महिलेचे घर गाठून हे कृत्य केले. पैशांच्या कारणातून संतप्त दोघा संशयितांनी पीडितेस शिवागाळ व दमदाटी करीत घरातील झाडांच्या कुंड्याची तोडफोड केली. तसेच महिलेस काठीने बेदम मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.