नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉप, रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी सरकारवाडा आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना वडनेर दुमाला येथे घडली. सुशमा प्रेमचंद केवट (रा.पंपीग स्टेशन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. केवट कुटुंबिय मंगळवारी (दि.२५) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चार चोरट्यांनी त्यांच्या बंद बगल्याच्या खिडकीची जाळी कापून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १४ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
दुसररी घटना गंगापूररोडवरील लोकमान्यनगर भागात घडली. येथे राहणा-या ऋषभ कैलास शिंदे (२१ रा.सुयोग बंगला) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिंदे कुटुंबिय रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.