नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. योगेश दत्तात्रय बोबडे (वय २२, मूळ रा. कर्जत, अहमदनगर) असे मृत विद्याथ्यार्चे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बोबडे ध्रुवनगर परिसरातील मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या पदवीचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका गृह प्रकल्पात भाडेतत्वावर खोली घेत योगेश व त्याचे मित्र राहत होते. काही महिन्यांपासून त्याला आजारपणामुळे हातात सातत्याने क्रॅम्प यायचे.
नुकत्याच सुरू झालेल्या लेखी परीक्षेत त्याला उत्तरे लिहिणे अवघड झाले. परीक्षेवेळी त्याला हात सुन्न पडला. त्यामुळे योगेशचा मानसिक तणाव अधिक वाढत गेला. परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीसह आजारपणामुळे अधिक वैफल्यग्रस्त झालेल्या योगेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या रूममध्ये गळफास लावून घेत जीवन संपवले.
दरम्यान, योगेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या कारणांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोतीवाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. योगेशचे कुटुंबीय रात्री उशिराने गावावरुन नाशिकमध्ये दाखल झाले.
आणखी एकाची आत्महत्या
५८ वर्षीय व्यक्तीने झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गंगापूर शिवारात घडली. सत्तार गफार शेख (रा.आनंदमंगल रो हाऊस,भवर टावर मागे,शिवाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेख यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले तरी त्याच्या अंगझडतीत सुसाडईड नोट मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख यांनी मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास मोतीवाला कॉलेज समोरील मोकळया पटांगणात बाभळाच्या झाडास अज्ञात कारणातून दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा जब्बार शेख यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.