नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील भवर टॉवर भागात धारदार गुप्तीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणा-या तरूणाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या तरुणाकडून गुप्ती जप्त केले आहे. विकी उर्फ पंकज कैलास क्षिरसागर (२८ रा. दगडी बिल्डींग, जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या शस्त्रधारी संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीतील भवर टॉवर भागात एक तरूण धारदार गुप्तीचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२४) पोलिसांनी धाव घेत कृष्णा स्विटस जवळ संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून धारदार गुप्ती हस्तगत करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.