नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महात्मा नगर परिसरातील सारथी सोसायटीमध्ये चोरट्यांकडून बिनधास्तपणे घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. महात्मा नगर येथे दाट लोकवस्ती असून उच्चभ्रू वर्ग या परिसरात वास्तव्यास आहे.
दाट लोकवस्तीचा भाग असताना देखील येथील सारथी सोसायटीमध्ये २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दोन चोरटे हे घरफोडी करण्याच्या उद्देशाने एका बंद घराचा दरवाजा बिनधास्तपणे तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
या फुटेजमध्ये चोरट्यांचा मनात पोलिसांचा धाक कुठेचा धाक दिसत नाही. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशी चांगलेच धास्तावले असून त्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. आता या घटनेकडे पाहता नाशिक शहर पोलीस काय कठोर पाऊले उचलतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे…