नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पळसे येथील चिंचोळे रोड भागात दिरास जेवण करून घ्या असे सांगितल्याने संतप्त पती आणि दिराने विवाहीतेस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी वस्तू मारून फेकल्याने महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शिवाजी गायखे (३७) व नितीन शिवाजी गायखे (३५ रा. खडीक्रेशरजवळ, चिंचोळेरोड, पळसे) अशी महिलेस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. २७ वर्षीय पिडीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.२२) रात्री ही घटना घडली. महिलेने तिचा दिर नितीन गायखे यास जेवण करून घ्या असे सांगितल्याने संतप्त पती राजेंद्र गायखे व संशयित दिराने वाद घालत तिला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत लोखंडी वस्तू मारून फेकण्यात आल्याने पिडीत महिला जखमी झाली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650453688857808897?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650453655810899968?s=20