नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सापडलेला मोबाईल परत देणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. नितीन गणपत जाधव (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. या सर्व प्रकारात नितीनला त्याचा जीव गमवावा लागला आहे. हा सारा प्रकार सिडको परिसरात घडला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गणपत जाधव (वय ३०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सिडको मध्ये नितीन राहत होतो. ८ एप्रिल रोजी त्याला मोबाईल सापडला होता. हा मोबाईल परत करण्यासाठी गेला असता. त्याला माझ्या पत्नीला फोन का करतो असे सांगत त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यानचा त्याचा आज मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी नितीनचे वडील गणपत रामभाऊ जाधव, (रा. हिसवळ, ता. नांदगाव जि. नाशिक) यांनी तक्रार दिली आहे.
गणपत जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नितीनला ७ एप्रिल रोजी एक मोबाइल सापडला होता. तो कुणाचा आहे याचा त्याने शोध घेतला. त्यामुळेच ज्यांचा हा मोबाईल आहे त्यांना तो परत देण्यासाठी गेला. माझी पत्नी पल्लवीला का सतत फोन करतोस, अशी विचारणा निलेश ठोके याने केली. यावेळी ठोकेसह त्याचा साथीदार प्रसाद शिरीष मुळे आणि अन्य एका साथीदाराने नितीनशी वाद घातला. तसेच, त्याला लोखंडी सळईने मारहाण केली. या मारहाणीत नितीन अतिशय गंभीर जखमी झाला. अखेर नितीनचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर अधिक तपास करत आहे.
#Happy #Birthday #Sachin #Tendulkar सचिनच्या नावावर आहेत हे विश्वविक्रम… जे कुणीच करुच शकणार नाही.. https://t.co/T1z3g5MsAb
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 24, 2023
आकाशातील विमानाला धडकला पक्षी… इंजिनच पेटले… बघा, थरारक व्हिडिओ https://t.co/0SAW7BDxCA
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 24, 2023