नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोड भागात प्रेमप्रकरणास नकार दिल्याने संतप्त तरूणाने चाकूचा धाक दाखवत महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. निलेश प्रताप मोरे (रा.मायलेकरू निवास, तुळजाभवानी नगर, पेठरोड) असे संशयित चाकूधारीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्णनगर भागात राहणा-या ३१ वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.२२) रात्री संशयिताने पीडितेच्या घरासमोर येवून आरडाओरड केली. यावेळी महिला घराबाहेर आली असता त्याने माझ्याशी प्रेमसंबध ठेव तसेच मला तुझ्या घरात येवू दे असा आग्रह धरला.
यावेळी महिलेने त्यास नकार दिला असता त्याने शिवीगाळ करीत चाकूचा धाक दाखवत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650399563692515328?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650399139933351937?s=20