नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे २५ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र आणि महत्वाच्या कागदपत्र चोरुन नेले.
याप्रकरणी याप्रकरणी सुनिता संतोष पिटकर (३५ रा. रेणूका संकुल चाळ, शनिमदिरासमोर, पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत शेजा-यांनीच चोरी केल्याचा संशय तक्रारदार महिलेने व्यक्त केला आहे.
पोलिसांनी तक्रारीवरुन दिलेल्या माहितीनुसार संतोष पंडीत धोत्रे, वैशाली पंडीत धोत्रे, चंद्रकला पंडित धोत्रे, अनिता दत्ता लष्कर, नरेश बाबुलाल शहा व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पिटकर या गेल्या सोमवारी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही चोरी झाली होती.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम सोन्याचे मंगळसूत्र आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २४ हजार ६५० रूपये किमतीच्या ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.