नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सारडा सर्कल भागात मध्यरात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने दुचाकीवर फिरणा-या सराईत चोरट्यास पोलिसांनी गजाआड केले.त्याच्या ताब्यातून लोखंडी कटावणीसह घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. रिझवान मलंग शहा (२३ रा.कुरेशी नगर,मोठा राजवाडा वडाळानाका) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहा चोरी आणि घरफोडी करण्यात माहिर असून त्याच्याविरूध्द मुंबईनाका पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि.२३) रात्री मुंबई नाका पोलिसांचे गस्ती पथक परिसरात गस्त घालत असतांना तो पोलिसांच्या हाती लागला. सारडा सर्कल कडून मध्यरात्रीच्या सुमारास तो गडकरी चौकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होता. पोलिसांनी पाठलाग करून संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या दुचाकीस लावलेली लोखंडी कटावणी व चेहरा बांधता येईल असे कपडे त्याच्या कडे मिळून आले. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650401987043704832?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650399634676916224?s=20