नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रबुध्दनगर भागात घराच्या बांधकामाच्या कारणातून एकाने मायलेकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंजना विष्णू गांगुर्डे (रा.भीमशक्ती चौक) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने मायलेक जखमी झाले असून
संतोष धोंडीराम मनोहर (रा.भिमशक्ती चौक, प्रबुध्दनगर) असे मायलेकास मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. संशयित आणि महिला एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात घर बांधण्याच्या कारणातून वाद आहे. गेल्या मंगळवारी (दि.४) रात्री ही घटना घडली. महिलेचा मुलगा चौकात उभा असतांना संशयिताने त्यास गाठून याच कारणातून शिवीगाळ करीत मारहाण केली.
यावेळी महिला आपल्या मुलाच्या मदतीला धावून गेली असता संशयिताने दोघा मायलेकांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मायलेक जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1649706236005457920?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1649706170414927872?s=20