नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरात पार्क केलेल्या कारमधील पर्स मधून चोरट्यांनी रोकडसह दागिणे चोरून नेले. अज्ञात चोरट्यांनी हॉटेल समोर पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून त्यांच्या बहिणीच्या पर्स मधील रोकड व अलंकार असा सुमारे १ लाख २४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिस दप्तरी चोरीची नोंद करण्यात आली आहे.
अभिजीत अशोक सोमय्या (रा.वजिराबाद जि.नांदेड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमय्या कुटुंबिय शुक्रवारी (दि.२१) शहरात आले होते. नाशिकरोड येथील अमृततुल्य चहाच्या समोरील इडली वडापाव हॉटेल येथे ते नास्त्यासाठी थांबले असता ही घटना घडली. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1649683104024645632?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1649683138409533440?s=20