नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या भागात शहरात राहणा-या दोघांनी गुरूवारी आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पोलिस दप्तरी वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना एकलहरारोड भागात घडली. महेश रघुनाथ गायकवाड (२३ रा. मगरमळा, एकलहरारोड) या युवकाने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रघूनाथ गायकवाड यांनी खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.
दुस-या घटनेत देविदास जगन्नाथ खैरनार (६० मुळ रा. वाडीबर्डी, ता.मालेगाव हल्ली अनिल नागरे यांच्या मळ्यात चाडेगाव पाटाजवळ) यांनी बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून अॅसिड सेवन केले. ही बाब निदर्शनास येताच शेत मालक अनिल नागरे यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
अर्धांगवायूचा झटका आल्याने एका बंदीवासाचा मृत्यू
अर्धांगवायूचा झटका आल्याने एका बंदीवासाचा मृत्यू झाला. उदय उर्फ बाबा भोला भारती असे मृत कैद्याचे नाव आहे. उद्य या कैद्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर कैदी प्रदिर्घ काळापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा भोगत होता. गेल्या शनिवारी (दि.१) त्यास पक्षाघाताचा त्रास झाला. जेलरक्षक गोपाल सुरकुटलवा यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.१७) उपचार सुरू असतांना डॉ. राहूल भराटे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.