नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका परिसरातील बसथांबा जवळ बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या महिलेच्या पर्स मधील ४० हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन सुरेश दंडगव्हाळ (रा.अटलरी सेंटर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दंडगव्हाळ या बुधवारी (दि.१९) बाहेरगावी जाण्यासाठी द्वारका भागात आल्या होत्या. द्वारका हॉटेल समोरील बसथांब्यावर त्या बसची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या पर्सची चैन उघडून ४० हजाराची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648931269852667904?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648931237632028672?s=20