नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. सोमेश्वर कॉलनीत ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरुन नेली.
याप्रकरणी मंदाबाई अशोक आवारे (५० रा.भाग्यलक्ष्मी अपा.सोमेश्वर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवारे कुटुंबिय मंगळवारी (दि.१८) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे १ लाख ६१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवारे करीत आहेत.