नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सासरच्या मंडळीकडून माहेरून तीस लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ केला. मागणी पूर्ण होत नसल्याने स्त्रीधन काढून घेत पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकोला जिल्ह्यातील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष मोकळकर, उल्हास मोकळकर, प्रसाद मोकळकर, विजय धुरतकर, संजय धुरतकर, संगिता मोकळकर, जया धुरतकर व ममजा धुरतकर (रा. सर्व कौलखेडा जि.अकोला) अशी संशयितांची नावे आहेत. गंगापूररोड भागात वास्तव्यास असलेल्या विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि आशिष मोकळकर हे दोघे पती पत्नी असून, पीडितेने माहेरून ३० लाख रूपये आणावेत या मागणीसाठी संशयित सासरच्या मंडळीकडून गेल्या २२ मे पासून छळ सुरू आहे.
छळ करूनही विवाहीतेकडून मागणी पूर्ण होत नसल्याने संशयितांनी तिचे स्त्रीधन काढून घेतले. तसेच, पतीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648956222731689986?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648956163059503104?s=20