नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह गोदापात्रात मिळून आला आहे. गणेश मारूती शिंदे (३२ रा.अमृतवर्षा कॉलनी,साईनाथनगर वडाळा पाथर्डीरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. गणेश याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गेल्या रविवारी (दि.१६) कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरा पर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोधा शोध केली मात्र तो मिळून आला नाही. कामावरही पोहचला नसल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली होती. पोलिस दप्तरी मिसींग दाखल करण्यात आल्यानंतरही कुटुंबिय त्याचा शोध घेत असतांनाच बुधवारी (दि.१९) त्याचा मृतदेह कटारे ब्रीज परिसरातील गोदावरी नदीपात्रात मिळून आला.
त्याने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत तर्कवितर्क जोडले जात असतांनाच पोलिसांनी मात्र त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648979966221258752?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648979889410949121?s=20