नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने वेगवेगळया भागात घेवून जात प्रेयसीवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रेयसीच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रियकराला गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित मधुकर शिंदे (२१ रा.गंगापूर कॅनोल, माडसांगवी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. परिसरातील २० वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयितामध्ये प्रेमसंबध होते. या काळात संशयिताने तिचे अश्लिल फोटो काढले.
गेल्या तीन महिन्यात संशयिताने पीडितेचे घर गाठून तसेच त्याच्या घरी आणि पंचवटीतील एका लॉजवर घेवून जात अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने तरूणीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648979853260259328?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648979821584879618?s=20