जेलरोड भागात घरफोडी; कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ८० हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ८० हजाराच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरीला गेले आहे. याप्रकरणी चंद्रकांत अरविंद बिरारी (रा.तिरूपती रो हाऊस,केरू पाटील मार्ग,बोराडेनगर) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिरारी कुटुंबिय ६ ते १६ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.
रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वाराने हिसकावून नेला
त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हर्षल रमेश बोरसे (१९ र.अमृत गार्डन, वायर जीमच्या बाजूला त्र्यंबकरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरसे गेल्या शनिवारी (दि.१५) रात्री फोनवर बोलत आपल्या घराच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.