नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना वृध्द महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत भामट्यांनी लंपास केली. याप्रकरणी जिजाबाई दत्तात्रेय गायखे (७३ रा.वाडीचा मळा पळसे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायखे या सोमवारी (दि.१७) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला
शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी आडगाव आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना गंजमाळ भागात घडली. लक्ष्मण सखाराम पाडवी (रा.सारस्ते ता.त्र्यंबक हल्ली सोनजे कन्स्ट्रक्शन गोडावून तपोवन) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाडवी यांची स्प्लेंडर एमएच १५ डीआर १८८३ गेल्या रविवारी (दि.९) रात्री गंजमाळ येथील अप्सरा इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.
दुसरी घटना आमंत्रण हॉटेल परिसरात घडली. ऋषीकेश मुरलीधर धोंगडे (रा.सारीका हॉटेल जवळ, मेडिकल फाटा,वसंतदादानगर) यांची पॅशन प्रो एमएच १५ ईडब्ल्यू ४१७ गेल्या शुक्रवारी रात्री मेडिकल फाटा येथील आमंत्रण हॉटेल परिसरात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.