नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सरकारवाडा आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना जेलरोड भागात घडली. आदित्य पांडूरंग मोजाड (२२ रा.घरकुल हौ.सोसा.शिवाजीनगर) या युवकाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल पांडूरंग मोजाड यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोडवर घडली. मुळचा निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील नितीन यशवंत लोहकरे (३१ हल्ली रा.अभिनव बाल विकास मंदिर, गंगापूररोड येथील स्टाफ कॉर्टरमध्ये) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास कापडी पट्टा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संजय सुर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? धक्कादायक! *आदिवासी वसतीगृह अधिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार*
पेठ तालुक्यातील प्रकार
https://t.co/OzzYXYxjZW#indiadarpanlive #nashik #paint #crime #trible #school #minor #girl #student #rape #police— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 18, 2023