नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात हात उसनवार घेतलेल्या पैश्यांच्या कारणातून टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत बिअरची बाटली आणि काही तरी शस्त्राने मारहाण करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितू मांडवे, बिंदू सिंग व टिंक्या अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश संतोष जाधव (२३ रा.पेठ गल्ली, गंगापूर गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव रविवारी (दि.१६) रात्री शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी मार्केट भागात गेला होता. तिघा संशयितांनी त्यास गाठून हात उसनवार दिलेल्या पैश्याची मागणी केली. यावेळी टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.या घटनेत बिअरची बाटली आणि एकाने काही तरी हत्याराने जाधव यास मारहाण केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648255537363193859?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648255580405137411?s=20