नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी रविवारी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी उपनगर,पंचवटी,देवळाली कॅम्प व अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना लहवित ता.जि.नाशिक येथे घडली. योगेश पांडूरंग बोराडे (३६ रा.बाजगिरा,लहवित ता.जि.नाशिक) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. नातेवाईक सोमनाथ बोराडे यांनी त्यांना कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.
दुसरी घटना अंबड गावात घडली. अविनाश आनंदा जोपळे (३२ रा.मारूती संकुल,कारगील चौक दत्तनगर) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सारीका भोये यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
तिसरी घटना गांधीनगर येथे घडली. येथील संदिप चिंतामण गांगुर्डे (३० रा.सीपीडब्यूडी कॉर्टर) यांनी शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
चौथी घटना फुलेनगर येथे घडली. विजय जनार्दन बेंडकुळे (४७ रा.पाण्याच्या टाकीजवळ,फुलेनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून याबाबत संजय बेंडकुळे यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक लिलके करीत आहेत.