नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वज्ञ बॉईज होस्टेलमध्ये इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम शिवाजी खैरे (मुळ रा.कापसी ता.देवळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभमच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम खैरे हा विद्यार्थी आडगाव शिवारातील एका नामांकित विद्यालयात पॉलिटेक्नीकचे शिक्षण घेत होता. भुजबळ नॉलेज सिटी मार्गावरील सर्वज्ञ बॉईज होस्टेल येथे वास्तव्यास असतांना त्याने हे कृत्य केले. गुरूवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास अन्य विद्यार्थी होस्टेल बाहेर असतांना त्याने आपल्या रूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता.
विद्यार्थी आपआपल्या रूममध्ये परतले असता ही घटना उघडकीस आली. होस्टेल चालकांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646831320134479872?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646831220490407936?s=20