नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कोटक महिंद्रा बँकेच्या थत्तेनगर शाखेत ग्राहकाच्या भरण्यातील पाचशे रूपयांच्या सात नोटा बनावट आढळल्या आहे. याप्रकरणी संगिता चिनावले (रा.खुटवडनगर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिनावले कोटक महिंद्रा बँकेच्या थत्तेनगर शाखेत कार्यरत आहेत. गुरूवारी (दि.१३) त्या सेवा बजावत असतांना रमेश शहा नामक ग्राहकाने केलेल्या भरण्यात या नोटा मिळून आल्या. भरण्यातील पाचशेच्या सात नोटा बनावट आढळून आल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646831320134479872?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646831252287401984?s=20