नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बापलेकास बेदम मारहाण करून एकास जखमी केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटूंबिक वादातून झालेल्या या घटनेत चार नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. संतोष भोसले (४८) चेतन संतोष भोसले (२५ रा.दोघे मखमलाबाद नाका), किरण संतोष भोसले (२२) व सुभाष राजू जाधव (३६ रा.दोघे लामखेडे मळा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सोमनाथ आसाराम भोसले (२४ रा.बिडीकामगार नगर,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार आणि संशयित एकमेकांचे नातेवाईक असून गुरूवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास सोमनाथ भोसले हे निमाणी बसथांबा भागात आपला टरबुज विक्रीचा व्यवसाय करीत असतांना ही घटना घडली. संशयितांनी कौटूंबिक वादाची कुरापत काढून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत काही तरी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आल्याने त्यांचा कान निखळला असून हा वाद मिटविण्यासाठी सोमनाथ यांचे वडिल आसाराम भोसले हे आपल्या मुलाच्या मदतीला धावून आले असता त्यांनाही संशयितांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे बापलेक जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची दखल घेत पोलिसांनी तात्काळ वरिल चार संशयितांना अटक केली आहे. तर संतोष आसाराम भोसले (रा.विठाई हॉस्पिटल जवळ,मखमलाबाद नाका) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमनाथ भोसले आणि कुणाल भोसले या भावांनी निमाणी बस स्टॉप भागात गाठून कौटूंबिक वादातून शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मिथून परदेशी आणि हवालदार अनिल सोर करीत आहेत.