नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. आनंदा आहिरे (४५),स्वाती आहिरे (३५) व प्राची आहेर (३७ रा.दगडचाळ भगूर) अशी युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी दिक्षा प्रकाश सोनवणे (रा.राजवाडा भगूर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
अनमोल प्रकाश सोनवणे (१८ रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा भगूर) या युवकाने १४ मार्च रोजी रात्री भगूर गावातील स्मशानभूमी भागात असलेल्या एका रूममध्ये गळफास लावून घेतला होता. मयत अनमोल हा संशयिताकडे मोबाईल मागण्यासाठी गेला होता.
मात्र संशयितांनी त्यास परत मोबाईल मागू नको तू जावून जीव दे नाही तर आम्ही तुला मारून टाकू असा दम देत त्यास बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दिक्षा सोनवणे यांनी आपल्या तक्रारीत केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646000535437479938?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646000499601317888?s=20