नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घर आणि गाळयावर कब्जा केल्याचा जाब विचारत पोलिसात तक्रार केल्याने टोळक्याने मायलेकींना जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनम डहाळे, सनिल डहाळे ,निलम माळवे, सचिन माळवे (रा.चौघे समर्थनगर,पाथर्डी गाव), उर्मिला महालकर, कांचन इंगळे, पूजा सिंग व सागर कांबळे अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुळच्या अहमदनगर येथील अर्चना विक्रम महालकर (४२ रा.इंदिरानगर,नाशिक) यानी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या १२ मार्च रोजी औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात ही घटना घडली.
वर्मा हॉल परिसरात संशयित टोळक्याने महालकर व त्यांच्या मुलीस गाठून ही मारहाण केली. महालकर यांनी घर व गाळयावर कब्जा का केला याबाबत जाब विचारून संशयितांवर पोलिसात तक्रार केल्याने संतप्त टोळक्याने त्यांना व त्यांच्या मुलीस शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देवून बेदम मारहाण केली. याघटनेत मायलेकी जखमी झाल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवारे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20