नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात भरधाव चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने वृध्द दुचाकीस्वाराचा रस्त्यावर पडल्याने मृत्यू झाला. गौराज दिपाजी केदारे (८३ रा.सानेगुरूजी नगर,जेलरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केदारे रविवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडकडून आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला. जेलरोड परिसरातील सेंट फिलोमिना शाळे समोरून ते दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीस हुलकावणी दिली.
या अपघातात केदारे रस्त्यावर पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व गुडघ्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. दिग्वीजय पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक कु-हाडे करीत आहेत.