दम देऊन महिलेवर अत्याचार; संशयिताला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय रमेश इंगळे (दिपाली बिल्डीग, सावरकर चौक, नवनाथनगर) असे संशयितांचे नाव आहे. या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, संशयित इंगळे याच्या विरोधात पीडित महिलेने तक्रार दिली असून तिच्या तक्रारीनुसार, गंगापूर रोड आणि कॉलेज रोड येथील हॉटस्पॉट कॅफे भागात संशयिताने दम देऊन १७ जुलै २०१९ ते ८ नोव्हेंबर २०२० दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ठक्कर बाजार परिसरात ही घटना घडली. संदीप उर्फ संचा भिकाजी आहिरे (वय ४१, गणेश चौक रामवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
गुरुवारी (दि.६) दुपारी बाराच्या सुमारास सुनील देवराम महाजन (वय ५२, महालक्ष्मी रेस्टॉरन्ट, मेन रोड) मुळ जळगाव आणि संदीप आहिरे यांच्यात वाद होउन वादाचे पर्यावसन भांडणात झाले त्यात, संदीप आहिरे याने शिवीगाळ करीत, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.