दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५ ग्रॅमची सोनसाखळी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५ ग्रॅमची सोनसाखळी ओरबडून नेल्याची घटना पंचवटीतील दिंडोरी रोड वरील तारवालानगर भागात घडली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तारावालानगर सिग्नलच्या बाजूला राज स्वीटस जवळ हा प्रकार उघडकीस आला.
कलानगर भागातील शिवगंगानगर येथील मेघा सुर्यकांत आसलकर (वय ४०, साई संस्कृती अपार्टमेंट) या रात्री त्यांच्या ॲक्टीव्हा दुचाकीवरुन जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणा-या वाहनावर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैधपणे पान मसाले, जर्दा आणि च्युईगमसह प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणा-या वाहनावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या पथकाने अन्न सुरक्षा कायद्यार्तंगत प्रतिबंधित ऐवज हस्तगत केला.
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार संजय काशीनाथ ताजणे यांच्या तक्रारी वरुन वैभव दिलीप ताजणे (वय २४, वडजाईमाता नगर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी (दि.७) दुपारी अडीचच्या सुमारास जत्रा हॉटेल ते नांदूर नाका रोडवर ही कारवाई करण्यात आला आहे.