नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माडसांगवी येथे झाडाची फांदी तोडण्याच्या वादातून गुरूवारी दोन गटात झालेल्या भांडणात चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली तर एकाच्या घरावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमन पप्पू बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनिल बर्वे, पुजा बर्वे, सूरज पिंगळे, दर्शन बर्वे, विशाखा बर्वे (रा.सर्व चारी नं.६ माडसांगवी ता.जि.नाशिक) आदींनी गुरूवारी चारी नं. ६ भागात जमाव जमवून सुमन बर्वे यांच्या कुटुंबियास शिवीगाळ करीत व मुलास बेदम मारहाण करीत त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.
या घटनेत खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरी तक्रार अनिल तानाजी बर्वे यांनी दाखल केली आहे. संशयित अमोल पोपट बर्वे,रोशन बर्वे व सुमन बर्वे आदींनी झाडाची फांदी तोडण्याच्या वादातून अनिल बर्वे यांच्यासह पत्नी व मुलीस काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643880462581133312?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1644195919464906752?s=20