नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरात दोन घरफोडून चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या मुद्देमाल लंपास केला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना उंटवाडी भागात घडली. प्रियंका पार्क भागात राहणा-या पल्लवी अभिजीत कुलकर्णी (रा.लोटस अॅव्हेन्युव्ह) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी कुटूंबिय रविवारी (दि.२) कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिडकीची काच व जाळी उघडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ४१ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले आणि पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
दुसरी घटना भुजबळ फार्म जवळ घडली. येथील संजय रमेश तेले (रा.गुरू चौक,भुजबळ फार्म जवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तेले कुटुंबिय १ ते ४ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा कोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व तांब्या पितळाची भांडी व इलेक्ट्रीक वस्तू असा सुमारे ३ लाख ४ हजार ९४० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643975584014561280?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643998288541253633?s=20