नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार अड्डा उदध्वस्त करत पोलिसांनी सहा जुगारींवर कारवाई करीत त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे तीन हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. शेवगेदारणा रोडवरील दारणा ग्रीन हॉटेल भागात हा छापा पोलिसांनी टाकला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश अशोक पाळदे (५२),दिपक सावळीराम कासार (३४),चंद्रकांत गंगाराम कासार (३५),शिवाजी शंकर कासार (४०),तुकाराम मुकूंदा कासार (५९ रा.सर्व शेवगेदारणा) व रतन मधुकर रोकडे (४९ रा.नानेगाव ता.जि.नाशिक) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. शेवगे दारणा रोडवरील संसरी गाव शिवारातील दारणा ग्रीन हॉटेल जवळ काही जण पत्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार छापा टाकला असता संशयित तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे तीन हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पोलिस कर्मचारी राहूल बलकवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.
? *इयत्ता बारावीच्या परीक्षेत होणार हा मोठा बदल*
https://t.co/OAptKewhWY#indiadarpanlive #maharashtra #hsc #board #exam #pattern #change— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023
⭕ अरे हे काय चाललंय…
करायचे होते कमरेचे ऑपरेशन…
*डॉक्टरने केले हृदयाचे…*
अखेर रुग्णाचा मृत्यू
https://t.co/vgPjkm0ipT#indiadarpanlive #hip #operation #doctor #heart #surgery #fortis #hospital— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023