नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना कॉलेजरोड भागात घडली. पुणे येथील प्रविण बन्सीराम मोरे (रा.विश्रांतवाडी,कळसरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे बुधवारी (दि.५) कामानिमित्त शहरात आले होते. डिसूझा कॉलनीतील विठ्ठल बंगल्याच्या आवारात त्यांनी आपली पल्सर एमएच १४ सीझेड ७६२८ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
दुसरी घटना गोदाघाट भागात घडली. वडाळा पाथर्डी रोड भागातील शंकर अशोक लांडे (रा. नंदिनीनगर शिवाजीवाडी) हे गेल्या २८ मार्च रोजी गोदाघाट भागात गेले होते. रामकुंडावरील यशवंत महाराज समाधी मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये त्यांनी आपली एमएच १५ डीडब्लु ६९९५ मोटारसायकल पार्क केली असता ती चोरट्यानी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
⬜ *या सरकारी योजनेतून तब्बल १२ हजार युवकांना मिळाले कर्ज…* तुम्हालाही मिळू शकते…
असा घ्या लाभ…
https://t.co/LJr3EQTb4H#indiadarpanlive #maharashtra #government #scheme #loan #benefit #12thousand #youth— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023
⬜ *कलम ३७० हटविल्यानंतर परराज्यातील किती जणांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली?* सरकार म्हणाले…
https://t.co/yAPel7RSiE#indiadarpanlive #act370 #jammu #kashmir #land #purchasing— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023