नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जेलरोड भागात भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय पादचारी ठार झाला. ज्ञानेश्वर बाळू घोरपडे (रा.इंदिरानगर झोपडपट्टी जेलरोड) असे मृत पादचारीचे नाव आहे.
याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घोरपडे बुधवारी (दि.५) रात्री ए गार्डन जवळील कैलासजी सोसायटी समोरून आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचएल ००५८ या चारचाकीने त्यास जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाबासाहेब गुडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारचाकीचा चालक भैय्या सतिश भालेराव (रा.जेलरोड) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
⭕ अरे हे काय चाललंय…
करायचे होते कमरेचे ऑपरेशन…
*डॉक्टरने केले हृदयाचे…*
अखेर रुग्णाचा मृत्यू
https://t.co/vgPjkm0ipT#indiadarpanlive #hip #operation #doctor #heart #surgery #fortis #hospital— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023
? मोठा दिलासा!
*मुंबईत साकारणार तब्बल १७ मजली टाटा कॅन्सर हॉस्पिटल*
या सुविधा मिळणार
https://t.co/xjyQhAUhRC#indiadarpanlive #mumbai #17floor #tata #cancer #hospital #treatment #health— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023