नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ६८ वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड भागात घडली. सुरेश सुखदेव पाटील (रा .प्रतिक गौरव सोसा. वैशालीनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पाटील यांनी बुधवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या हुकास मफलर बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा रितेश पाटील याने त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643907419066740736?s=20