नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका वृध्दाच्या भूखंडावर बनावट कागदपत्राच्या आधारे त्रिकुटाने कब्जा केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सगीर मुनिरोद्दीन सय्यद,जयश्री चंद्रमोरे आणि अफाक शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार नामदेवराव फुलकर (६३ रा.श्रीरामनगर, नांदूर लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
फुलकर हे अनुसूचित जाती जमातीचे असल्याबाबत माहिती असतांनाही संशयितांनी त्यांच्या मालकीच्या वडाळागाव शिवारातील सर्व्हे नं. ७६ -२-१ ब या भूखंडाचे १ एप्रिल २००७ ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी या भूखंडावर कब्जा करून जमिनीच्या उपभोगापासून तसेच नागरी व विशेष हक्काच्या उपभोगापासून वंचित ठेवले. अधिक तपास सहाय्यक आयुक्त भुसारे करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा लाठीमार!
*….'त्या' प्रकारानंतर गौतमीने घेतला हा मोठा निर्णय*
https://t.co/UrjVmMIP6p#indiadarpanlive #dancer #gautami #patil #program #lathi #charge— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023