नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा दारू विक्री करणा-या दोघा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करत देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर भागात हा छापा टाकण्यात आला.
पप्पू मुरलीधर नरवाडे व सचिन बळीराम म्हस्के (रा.दोघे बुध्द विहारजवळ,संत कबीरनगर,भोसला मिलीटरी स्कूल जवळ) अशी पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी समाधान शहाजी आहेर यांनी तक्रार दाखल केली आहे. बुध्दविहार भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.५) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित मद्यविक्रीसाठी दारूचा साठा बाळगतांना मिळून आले.
त्यांच्या ताब्यातून सुमारे ७०० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.