नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तीन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृताच्या आई वंदना शेखर गायकवाड (५४ रा.जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तीन महिलांच्या छळास कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी अतूल गायकवाड (४० रा.वैष्णव प्रसाद अपा., संसरीगाव), शालिनी बागडे (६०) व पिंकी बागडे (३० रा.अरिंगळे मळा, सिन्नरफाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.
संसरी गावातील अतुल शेखर गायकवाड (४० रा.वैष्णव प्रसाद अपा.) यांनी १३ मार्च रोजी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येस वरिल तीन संशयित महिला कारणीभूत असल्याचा आरोप मृताच्या आईने केला असून अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643907419066740736?s=20