नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील वस्त्रांतरगृहाच्या कार्यालयातून चोरट्यांनी पुजा पाठ साहित्य चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.३) रात्री घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम धोंडू शिंपी (रा.गांधीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोदाघाटावरील महापालिकेच्या वस्त्रांतरगृहाच्या व्यवस्थापन कार्यालयाचे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सुमारे १९ हजार २७० हजार रूपये किमतीचे पुजा साहित्य चोरून नेले. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
महागडी केमिकल प्रोसोसिंग मोटार चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवन क्रॉसिंग भागात पार्क केलेल्या मालट्रकमधून चोरट्यांनी महागडी केमिकल प्रोसोसिंग मोटार चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू वसंत तांबे (रा.वाल्मिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तांबे यांचा माझदा कंपनीचा मालट्रक गेल्या ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान तपोवन क्रॉसिंग येथील कृष्णनगर भागातील जलाराम ट्रान्सपोर्ट समोर पार्क केलेला असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील सुमारे ७६ हजार ९४८ रूपये किमतीची केमिकल प्रोसोसिंग मोटार चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक खाजेकर करीत आहेत.