नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९७ हजार रूपये किमतीच्या ऐवज लंपास केला. सिडकोतील सिंहस्थनगर भागात ही चोरी करत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल चोरुन नेला.
या घरफोडी प्रकरणी अमोल जनार्दन मानकर (रा.आशिर्वाद किराणामागे,सिंहस्थनगर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीची नोंद करण्यात आली आहे.
मानकर कुटुंबिय मंगळवारी (दि.४) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे ९७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.