नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवनात एकटी असल्याची संधी साधून पती व मुलांना मारून टाकण्याची धमकी देत एकाने बळजबरीने घरात घुसून विवाहीतेवर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेत पीडितेने संशयिताच्या पत्नीकडे आपबिती कथन केली असता तिने याबाबत वाच्यता केल्यास तुझ्याच पतीविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून, याप्रकरणी संशयितासह त्याच्या पत्नीविरोधात बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजीत पाटील व वृषाली पाटील (रा.तपोवन) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित दांम्पत्य आणि पिडीता एकाच भागातील रहिवासी असून रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडिता एकटी असल्याची संधी साधत घरात शिरलेल्या संशयिताने पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्यासह बलात्कार केला.
याबाबत पीडितेने संशयिताच्या पत्नीकडे आपबिती कथन केली असता तिने याबाबत वाच्यता केल्यास उलट तुझ्याच पतीविरोधात बलात्काराची खोटी तक्रार देईल अशी धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.