नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणा-या तिघांनी सोमवारी आत्महत्या केली. आत्महत्या करणा-या दोघांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन केले. याप्रकरणी भद्रकाली सरकारवाडा व उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना उपनगर परिसरात घडली. सुरेश ज्ञानेश्वर महाले (२२ रा.पुजा एव्हेन्यू सोसा.म्हसोबा मंदिराच्या बाजूला) यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
दुसरी घटना व्दारका भागात घडली. येथे राहणा-या विकास शिवाजी वालझाडे (३१ रा.उमेश बंगला,गणेशनगर) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील दुस-या मजल्यावरील हॉलमध्ये पंख्यास चादर बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.
तिसरी घटना रविवार कारंजा भागात घडली. लोणार लेन मधील टिळेवाडा येथील रहिवासी जयसिंग किसन टिळे यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.