नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागात तिघा कामगारांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात महंमद मन्सरी आणि मुस्ताक मन्सूरी हे काका पुतणे गंभीर जखमी झाले होते. त्यातील पुतण्या महंमद मन्सूरी याचा मृत्यू झाला. तर काकावर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृर्ती गंभीर आहे. याप्रकरणी वाहनासह पसार झालेल्या कारचालकाविरूध्द सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ मोहम्मद कलीम मुल्ला मन्सूरी याने तक्रार दाखल केली आहे. मृत महंमद मन्सूरी काका रशिद मन्सूरी आणि मुस्ताक मन्सुरी यांच्या समवेत बुधवारी (एका कारखान्यात कामावर गेले होते. काम आटोपून काका पुतणे सायकल लोटत घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. अंबड लिंकरोडने तिघे पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १७ एजे ११४७ या कारने तिघांना धडक दिली. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.