नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात धारदार कोयत्याचा धाक दाखवून परिरात दहशत निर्माण करणा-या त्रिकुटा विरूध्द पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन निवृत्ती कडलग (१९ रा.कार्बननाका शिवाजीनगर), अब्दूल रेहमान बरकतअली अन्सारी (१९ रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिवाजीनगर) व संघर्ष मोरे (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) अशी दहशत माजविणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोनू खाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
संभाजी कॉलनी चौकातील ऋतुराज हाईटस या बिल्डींगसमोर काही युवक कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२) रात्री पोलिस पथकाने धाव घेत संबधितावर कारवाई केली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? यंदाचा उन्हाळा कसा असेल? *आल्हाददायक की तापदायक?*
बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…
https://t.co/h8KR7chF4X#indiadarpanlive #summer #season2023 #weather #forecast #climate #manikrao #khule— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 4, 2023