नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी शिवारातील ज्ञानेश्वर नगर भागात मटेरियल वाहतूक करणा-यी लिफ्टला इलेक्ट्रीक करंट उतरल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. धोंडा दिपक वळवी (२८ रा.डायमंड रेसि. सातपूर अंबड लिंकरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वळवी सोमवारी (दि.३) ज्ञानेश्वरनगर भागात नव्याने सुरू असलेल्या कौशिक पटेल यांच्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. बांधकाम मटेरियल वाहतूक करणा-या लिफ्टमध्ये इलेक्ट्रीक प्रवाह उतरलेला असतांना त्याचा लिफ्टला धक्का लागल्याने तो जखमी झाला होता.
अन्य सहका-यानी त्यास तात्काळ नजीकच्या सिग्नस हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत विनोद भगत (रा.मोरे मळा,अंबड) यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? यंदाचा उन्हाळा कसा असेल? *आल्हाददायक की तापदायक?*
बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…
https://t.co/h8KR7chF4X#indiadarpanlive #summer #season2023 #weather #forecast #climate #manikrao #khule— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 4, 2023